मानव संसाधन शाखा ही पोलीस दलाच्या प्रशासकीय आणि कर्मचारी व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाची शाखा आहे. या शाखेचे मुख्य कार्य पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भरतीपासून ते सेवानिवृत्तीपर्यंतच्या सर्व प्रक्रियांचे व्यवस्थापन करणे हे आहे.
मानव संसाधन शाखेमुळे पोलीस दलातील व्यवस्थापन आणि प्रशासन सुकर होते. कुशल आणि प्रशिक्षित पोलिस दल तयार करून गुन्हेगारी नियंत्रण, कायद्याची अंमलबजावणी आणि नागरी सुरक्षेला बळकटी मिळते.